बातम्या
सम्राट अशोका विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राजेंद्रनगर येथे भव्य रॅली
By nisha patil - 4/10/2025 4:12:23 PM
Share This News:
सम्राट अशोका विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राजेंद्रनगर येथे भव्य रॅली
लेझीम, ढोल-ताशे आणि सांस्कृतिक देखाव्यांमधून बंधुतेचा आणि धम्माचा संदेश
सम्राट अशोका विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राजेंद्रनगर येथे स्वराज्य तालीम मंडळ आणि संयुक्त राजेंद्रनगर यांच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीद्वारे तीन महिन्यांच्या वर्षावासाची सांगता करण्यात आली.
रॅलीमध्ये ढोल-ताशांच्या गजरात लेझीमचे सादरीकरण आणि सांस्कृतिक देखावे सादर करण्यात आले. तब्बल शंभर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी एकत्रित लेझीम खेळाचे मनमोहक सादरीकरण करून वातावरण उत्साहवर्धक केले. देखाव्यात तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे जिवंत दर्शन घडविण्यात आले.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य लक्षात घेऊन या कार्यक्रमात बंधुता, ऐक्य आणि मानवतेचा संदेश देण्यात आला. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह घेतलेल्या ऐतिहासिक धम्मदीक्षेची आठवण या सोहळ्यात जागवण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन सुखदेव बूधाळकर, अध्यक्ष प्रवीण बनसोडे, सुरेश आठवले, शिवराम बुधाळकर आणि पंकज आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुस्ताक मलबारी, आजम शेख, नागेश शिंदे, नामदेव नागतळे, उदय कांबळे, दयानंद गालफाडे, सुरेश नागटिळे, तसेच महिला कार्यकर्त्या आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सम्राट अशोका विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राजेंद्रनगर येथे भव्य रॅली
|