बातम्या
अशोकराव फराकटे यांची शरद सहकारी सुत गिरणीचे उपाध्यक्षपदी निवड...
By nisha patil - 11/8/2025 5:14:27 PM
Share This News:
अशोकराव फराकटे यांची शरद सहकारी सुत गिरणीचे उपाध्यक्षपदी निवड...
कसबा वाळवे गावचे सुपुत्र, माजी तंटामुक्ती अध्यक्ष आणि लोकनियुक्त सरपंच मा. अशोकराव मारूती फराकटे यांची शरद सहकारी सुत गिरणीच्या उपाध्यक्ष (व्हा. चेअरमन) पदी निवड झाली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल गावकऱ्यांसह मित्र-परिवार, सहकारी व मान्यवरांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या फराकटे यांच्या निवडीमुळे संस्थेच्या प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
अशोकराव फराकटे यांची शरद सहकारी सुत गिरणीचे उपाध्यक्षपदी निवड...
|