राजकीय

प्रभाग १८ मध्ये आप–वंचित युतीच्या उमेदवार अश्विनी सुरज सुर्वे यांचा प्रचार शुभारंभ

Ashwini Suraj Surve begins in Ward 18


By nisha patil - 12/27/2025 12:10:10 PM
Share This News:



कोल्हापूर :- प्रभाग क्रमांक १८ मधील आम आदमी पार्टी व वंचित बहुजन आघाडीच्या युतीच्या उमेदवार मा. अश्विनी सुरज सुर्वे यांच्या प्रचाराचा शुभारंभ शुक्रवारी, दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी सुभाषनगर येथील साई मंदिरातून करण्यात आला.
या प्रचार शुभारंभप्रसंगी आम आदमी पार्टी व वंचित बहुजन आघाडीच्या युतीचे नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये आम आदमी पार्टीचे शहर संघटक संदीप देसाई, उत्तम पाटील, अरुण सोनवणे, मोईन मोकाशी, तसेच सुरज सुर्वे यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक, पक्षाचे कार्यकर्ते आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या
.
यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात मा. अश्विनी सुरज सुर्वे यांना शुभेच्छा व आशीर्वाद दिले. संपूर्ण कार्यक्रमात पक्षाचे झेंडे, घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला.
आम आदमी पार्टी व वंचित बहुजन आघाडी युती झाल्यानंतरचा हा पहिलाच अधिकृत प्रचार शुभारंभ असल्याने प्रभाग क्रमांक १८ मधील निवडणूक वातावरण अधिकच रंगतदार झाले असून, युतीच्या माध्यमातून परिवर्तनाचा संदेश घराघरात पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


प्रभाग १८ मध्ये आप–वंचित युतीच्या उमेदवार अश्विनी सुरज सुर्वे यांचा प्रचार शुभारंभ
Total Views: 26