बातम्या
देवकर पाणंद ते कळंबा साई मंदिर रस्त्याचे डांबरीकरण मार्गी; आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश
By nisha patil - 2/5/2025 9:55:23 PM
Share This News:
देवकर पाणंद ते कळंबा साई मंदिर रस्त्याचे डांबरीकरण मार्गी; आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश
कोल्हापूर शहरातील देवकर पाणंद ते कळंबा साई मंदिर या अत्यंत खराब अवस्थेतील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी १ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर झाला आहे. आमदार अमल महाडिक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होऊन कामास प्रारंभ होणार आहे.
रस्त्याच्या पाहणीनंतर आमदार महाडिक यांनी नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण झाले आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांचे त्यांनी विशेष आभार मानले.
महायुतीचे नेते कोल्हापूर शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण आणि दर्जा सुधारण्यासाठी कटिबद्ध असून, लवकरच शहरातील अनेक रस्ते सुधारले जातील, असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला. परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत आमदार महाडिक यांचे अभिनंदन केले आहे.
देवकर पाणंद ते कळंबा साई मंदिर रस्त्याचे डांबरीकरण मार्गी; आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश
|