बातम्या

दत्त कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांच्या मताला किंमत नाही .

At the Datta Factorys Annual General Meeting


By nisha patil - 10/9/2026 7:30:19 PM
Share This News:



दत्त कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांच्या मताला किंमत नाही .
 

दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे 57 वी वार्षिक सर्वसाधारण सभा  कारखाना कार्यस्थळावरती आयोजित करण्यात आली होती. सभेपूर्वी सभासदांनी कारखान्याच्या एकंदरीत कारभारावर अनेक विषय मांडले होते.
 

 त्यातीलच एक विषय कारखान्याने बाजारात  साखर ,मळी, बग्यास यांच्या वाढीव दरातुन मिळालेला फायदा शेतकऱ्यांना हंगाम सुरू होण्यापूर्वी दुसऱ्या हप्त्याच्या स्वरूपात द्यावा.
 

तसेच चालु गळीत हंगामामध्ये 5000/दर मिळाला पाहिजे .याचे वाचन करण्यात आले यावर सभेमध्ये सभासदांनी आपले विचार मांडण्यासाठी माईकची मागणी करण्यात आली पण कारखाना प्रशासनाने माईक दिला नाही त्यावेळी पोलीस प्रशासनानेसुद्धा अडवणूकीची भुमिका घेतली. 
त्यामुळे सभासदांनी आपल्या मागण्या कारखान्यापुढे मांडायचा का नाहीत?

 

 त्यांच्या मताला काय किंमत आहे का नाही?
 असे प्रश्न विचारत आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी   सभा त्याग केला.

 

मागील गळीत हंगामातील वाढीव नफ्यातील दुसरा हप्ता मिळाला पाहिजे व चालू गळीत हंगामामध्ये पाच हजार रुपये प्रति टन दर मिळाला पाहिजे.अन्यथा कारखान्यांना आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा   दिला. यावेळी प्रवीण माने अक्षय पाटील,  बिराजदारसर,राहुल माने ,नवनाथ पाटील, भीमराव माने गोपाळ चव्हाण, पोपट  राणे इत्यादी ऊस उत्पादक सभासद शेतकरी उपस्थित होते.


दत्त कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांच्या मताला किंमत नाही .
Total Views: 55