बातम्या

विवेकानंद महाविद्यालय प्राणिशास्त्र विभागात NET/SET परीक्षेच्या

At the Department of Zoology Vivekananda College


By nisha patil - 9/28/2026 10:54:45 PM
Share This News:



विवेकानंद महाविद्यालय प्राणिशास्त्र विभागात NET/SET परीक्षेच्या

 तयारीसाठी ऑनलाइन अतिथी व्याख्यान संपन्न

कोल्हापूर, दि. २८ सप्टेंबर २०२६ : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विवेकानंद महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने बी.एस्सी. व एम.एस्सी.च्या विद्यार्थ्यांसाठी “A Comprehensive Blueprint for NET/SET Exam Preparation” या विषयावर ऑनलाइन अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले.

या व्याख्यानासाठी श्री. पी. टी. भोयर, सहाय्यक प्राध्यापक व IQAC समन्वयक, राजीव विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, झरी-जामणी, हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. टी. सी. पाटील यांनी केले, तर श्री. गणेश फडके यांनी प्रमुख पाहुणे श्री. पी. टी. भोयर यांचा परिचय करून दिला.

श्री. भोयर यांनी NET/SET परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, अभ्यासाचे नियोजन, संदर्भ साहित्याचा वापर, मागील प्रश्नपत्रिकांचा सराव आणि वेळेचे व्यवस्थापन याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.

या व्याख्यानास प्राणिशास्त्र विभागातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, विभागप्रमुख डॉ. जी. के. सोनटक्के, एम.एस्सी. समन्वयक डॉ. एस. एस. देसाई व सर्व प्राध्यापकांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी कु. व्ही. के. पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.


विवेकानंद महाविद्यालय प्राणिशास्त्र विभागात NET/SET परीक्षेच्या
Total Views: 5