बातम्या

"वयाच्या १६ व्या वर्षी शिवरायांनी स्वराज्य घडवलं आणि ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी रचली; वयावरून टीका करणाऱ्यांना पुणे शिक्षक मतदारसंघातील मतदारच उत्तर देतील!"

At the age of 16 Chhatrapati Shivaji Maharaj established Swarajya

By nisha patil - 10/17/2026 4:39:43 PM
Share This News:

"वयाच्या १६ व्या वर्षी शिवरायांनी स्वराज्य घडवलं आणि ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी रचली; वयावरून टीका करणाऱ्यांना पुणे शिक्षक मतदारसंघातील मतदारच उत्तर देतील!"

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील प्रचाराची पातळी घसरली असून, विरोधकांकडून माझ्या वयावरून खालच्या थरावर जाऊन टीका केली जात आहे. 'वयाच्या ३० व्या वर्षी हा मुलगा काय करणार?' असा सवाल विचारणाऱ्यांना मी स्वतः उत्तर देणार नाही;

कारण वयाच्या १६ व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच वयात ज्ञानेश्वरी रचणारे संत ज्ञानेश्वर महाराज या महाराष्ट्राच्या मातीने पाहिले आहेत. त्यामुळे वयाचा दाखला देऊन कर्तृत्वाला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पुणे शिक्षक मतदारसंघातील सर्व सुज्ञ आणि सुशिक्षित मतदार मतदानाच्या दिवशी मतपेटीतून व निकालाच्या दिवशी माझ्या वतीने सडेतोड उत्तर देतील, असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
 
"वयाच्या १६ व्या वर्षी शिवरायांनी स्वराज्य घडवलं आणि ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी रचली; वयावरून टीका करणाऱ्यांना पुणे शिक्षक मतदारसंघातील मतदारच उत्तर देतील!"
Total Views: 13