खेळ
🟩 गोकुळ शिरगावचा अथर्व कुरुंदवाडे राज्यस्तरीय वुशु स्पर्धेसाठी पात्र 🥋🏆
By nisha patil - 8/10/2025 11:57:57 AM
Share This News:
हातकणंगले:- हातकणंगले तालुक्यातील आदर्श स्कूल, मिनचे येथे झालेल्या विभागीय शालेय वुशु स्पर्धेत सौ. अंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, गोकुळ शिरगाव
या शाळेचा विद्यार्थी कु. अथर्व दशरथ कुरुंदवाडे यांनी 48 किलो वजनी गटाखालील स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या चमकदार कामगिरीमुळे अथर्वची छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय वुशु स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्याच्या या यशामध्ये शाळेचे संस्थापक मान. के. डी. पाटील सर, प्राचार्य तेजस पाटील सर, क्रीडाशिक्षक सौ. नीता संकपाळ मॅडम, श्री. श्रेयस पाटील सर, श्री. जी. बी. पाटील सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
अथर्वच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संपूर्ण परिसरात त्याचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे. 🌟👏
🟩 गोकुळ शिरगावचा अथर्व कुरुंदवाडे राज्यस्तरीय वुशु स्पर्धेसाठी पात्र 🥋🏆
|