बातम्या

वक्फ कायद्याच्या आडून हिंदूंवर हल्ले – विश्व हिंदू परिषदेचे तीव्र आंदोलन

Attacks on Hindus under the guise of Waqf Act


By nisha patil - 4/19/2025 5:05:26 PM
Share This News:



वक्फ कायद्याच्या आडून हिंदूंवर हल्ले – विश्व हिंदू परिषदेचे तीव्र आंदोलन

बंगालमधील हिंदूविरोधी हिंसाचाराचा निषेध

पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायद्याच्या विरोधात हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचाराच्या विरोधात राज्यभरात ठिकठिकाणी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पश्चिम बंगाल सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. याच पार्शभुमीवर आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. 
 

दरम्यान हा हिंसाचार केवळ वक्फ कायद्याच्या विरोधापुरता मर्यादित नसून, हिंदूंना टार्गेट करण्याचा जिहादी कट रचला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. तर यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जीवर जोरदार टीका करण्यात आली.  त्या केवळ मतांच्या राजकारणासाठी जिहाद्यांना पाठीशी घालत आहेत. बांग्लादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना संरक्षण देऊन राज्यात अराजकता निर्माण केली जात असल्याचा त्याच्यावर करण्यात आला.दरम्यान पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, NIAमार्फत दोषींवर कठोर कारवाई करावी, सुरक्षा व्यवस्था सी.आर.पी.एफ.कडे सोपवावी, बांग्लादेशी व रोहिंग्या घुसखोरांना हाकलून द्यावे, सीमाभागात सुरक्षा तार बसवण्याच्या अडथळ्याची चौकशी व्हावी. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
 

या आंदोलनात विश्व हिंदू परिषदेचे अनिल दिंडे, सतीश मांगले, विनय बारड, हिंदू एकतेचे गजानन तोडकर, तसेच हिंदू एकता, हिंदू जनजागृती समिती, भाजप, शिवसेना, हिंदू महासभा, मराठा व्यापारी संस्था यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.


वक्फ कायद्याच्या आडून हिंदूंवर हल्ले – विश्व हिंदू परिषदेचे तीव्र आंदोलन
Total Views: 135