बातम्या
छ.शिवरायांच्या भूमीत मराठीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न – आ. सतेज पाटील
By nisha patil - 8/7/2025 6:22:53 PM
Share This News:
छ.शिवरायांच्या भूमीत मराठीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न – आ. सतेज पाटील
छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी म्हणजे मराठी अस्मितेचा अभिमान असून, या भूमीत मराठी भाषेला व संस्कृतीला दबावण्याचा प्रयत्न दिल्लीतील सत्ताधाऱ्यांकडून सुरू असल्याची तीव्र टीका काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.
“महाराष्ट्राच्या अस्मितेला सतत धक्का देणाऱ्या महायुती सरकारला जनता लवकरच योग्य जागा दाखवेल. छत्रपतींच्या महाराष्ट्रात मराठीचा आवाज कोणीही दाबू शकत नाही.”आज मिरा रोडमध्ये मराठी भाषिकांच्या निघालेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी बोलत होते.तर मराठी भाषेच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याचे चित्र हे अत्यंत दुर्दैवी असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
छ.शिवरायांच्या भूमीत मराठीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न – आ. सतेज पाटील
|