बातम्या
RPI विचार संवाद संमेलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा.- वैभव प्रधान
By nisha patil - 11/20/2026 3:37:26 PM
Share This News:
RPI विचार संवाद संमेलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा.- वैभव प्रधान
पॅंथरी आणि रिपब्लिकन पक्षामध्ये कार्यरत असणाऱ्यांचा" रिपब्लिकन कार्यकर्ता संघर्ष योद्धा पुरस्काराने होणार गौरव....
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्रावर आधारित निर्माण झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या 69 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून समाजक्रांती सांस्कृतिक चळवळीच्या वतीने रविवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी सायं. 4.30 वाजता आरपीआय विचार परिवर्तन संवाद व रिपब्लिकन कार्यकर्ता संघर्ष योद्धा पुरस्काराचे आयोजन केले असून गेले अनेक वर्ष रिपब्लिकन व पॅंथर चळवळीत कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे हे असून हुपरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष मंगलरावजी माळगे व पक्षाचे कायदेविषयक सल्लागार एड. राहुल सडोलीकर यांच्या मंगलहस्ते हा पुरस्कार वितरण केला जाणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करवीर तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाशीकर, स्वागताध्यक्ष म्हणून कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गुणवंत नागटिळे असून ज्येष्ठ फुले- शाहू-आंबेडकरी विचारवंत समीक्षक प्रा.डॉ.अमर कांबळे व युवा व्याख्याते विजय काळे हे "रिपब्लिकन पक्षाचा पॅंथरी झंजावात भविष्यात निर्माण होणे काळाची गरज" या विषयावर संवाद साधणार आहेत.
प्रमुख मान्यवर म्हणून शहराध्यक्ष सुखदेव बुद्धाळकर, जिल्हा संघटक राजेंद्र ठीकपुर्लीकर, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे आहेत. तरी कार्यकर्त्यांच्या या सन्मानाच्या सोहळ्यासाठी व रिपब्लिकन पक्षाला गतिमान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समाजक्रांती सांस्कृतिक चळवळीचे संस्थापक वैभव प्रधान, संदीप हेर्लेकर, पंकज राजन, रोहित केळोशीकर, सतीश गोरंबेकर, सागर कांबळे, विनोद कांबळे, सत्यजित कांबळे, सुहास कांबळे, महादेव कांबळे, सुशील कांबळे यांनी केले.
RPI विचार संवाद संमेलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा.- वैभव प्रधान
|