विशेष बातम्या
कुंभोज मतदारसंघात ऐश्वर्या पाटील यांची उमेदवारीकडे लक्ष!
By nisha patil - 10/27/2025 2:44:53 PM
Share This News:
कुंभोज मतदारसंघात ऐश्वर्या पाटील यांची उमेदवारीकडे लक्ष!
अनुभव, जनसंपर्क आणि स्थानिक पकड ठरणार ताकद..
तारा न्यूज साठी प्रतिनिधी किशोर जासूद हातकणंगले :जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच कुंभोज मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. यंदा या मतदारसंघासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्याने अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. त्यात हातकणंगले पंचायत समितीचे माजी उपसभापती अजय पाटील यांच्या पत्नी आणि माजी पंचायत समिती सदस्य ऐश्वर्या पाटील या देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
ऐश्वर्या पाटील यांची जमेची बाजू म्हणजे अनुभव, जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांशी घट्ट नातं.
अजय पाटील यांनी लाटवडे–खोची पंचायत समिती मतदारसंघातून दोनवेळा यश मिळवले, तर ऐश्वर्या पाटील यांनी त्याच मतदारसंघातून एकदा विजय मिळवला आहे. त्यामुळे दोघांचा स्थानिक पातळीवरील प्रभाव आणि जनसंपर्काचे मजबूत जाळे यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरू शकते.
सध्या मतदारसंघात ऐश्वर्या पाटील यांच्या वाढत्या जनसमर्थनामुळे कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात यावेळी चुरशीची लढत रंगणार असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत.
कुंभोज मतदारसंघात ऐश्वर्या पाटील यांची उमेदवारीकडे लक्ष!
|