बातम्या

कु. अवंतिका सोमनाथ कुंभार हिचे बी.एड. परीक्षेत विशेष प्राविण्य

Avantika kumbhar


By nisha patil - 5/25/2026 9:58:43 PM
Share This News:



कु. अवंतिका सोमनाथ कुंभार हिचे बी.एड. परीक्षेत विशेष प्राविण्य

कवलापूर : पश्चिम महाराष्ट्र कुंभार समाजाचे राज्याध्यक्ष तसेच साप्ताहिक कुंभ शिल्प चे सहसंपादक श्री सोमनाथ गणपती कुंभार (आण्णा) यांची सुकन्या कु. अवंतिका सोमनाथ कुंभार हिने Shivaji University मार्फत मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षणशास्त्र (बी.एड.) परीक्षेत ९० टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्य (डिस्टिंक्शन) श्रेणी प्राप्त केली आहे.

तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेल्या या यशामुळे कुंभार समाजासह कवलापूर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कु. अवंतिका हिच्या पुढील शैक्षणिक व उज्ज्वल भविष्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.


कु. अवंतिका सोमनाथ कुंभार हिचे बी.एड. परीक्षेत विशेष प्राविण्य
Total Views: 4