मनोरंजन
‘अवकारीका’ १ ऑगस्टला प्रदर्शित –
By nisha patil - 11/7/2025 6:45:58 PM
Share This News:
‘अवकारीका’ १ ऑगस्टला प्रदर्शित –
स्वच्छतेवर भाष्य करणारा सामाजिक चित्रपट
स्वच्छतेचे सामाजिक आणि मानसिक महत्त्व अधोरेखित करणारा ‘अवकारीका’ हा चित्रपट १ ऑगस्ट २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. रेडबड मोशन पिक्चर्स प्रस्तुत या चित्रपटात स्वच्छता कर्मचाऱ्यांचा संघर्ष, समाजप्रबोधन आणि मनशुद्धतेचा संदेश मांडण्यात आला आहे.
लेखक-दिग्दर्शक सीए अरविंद भोसले यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या चित्रपटात विराट मडके, रोहित पवार, स्नेहा बालपांडे, राहुल फलटनकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. कैलाश खेर, सुनिधी चौहान यांच्या आवाजातील गाणी आणि केंद्र शासनाचा पाठिंबा यामुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘अवकारीका’ १ ऑगस्टला प्रदर्शित –
|