बातम्या

अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त अवनी संस्थेचा उपक्रम – बालविवाह निर्मूलनाचा संदेश!

Avni Sansthainitiative on Amitabh Bachchans birthday

By nisha patil - 11/10/2025 5:26:09 PM
Share This News:

अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त अवनी संस्थेचा उपक्रम – बालविवाह निर्मूलनाचा संदेश!

कोल्हापूर – सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या 83 व्या वाढदिवसानिमित्त ‘अवनी’ संस्थेने एक सामाजिक संदेश देणारा आगळावेगळा उपक्रम राबविला. दसरा चौकात लहान मुला-मुलींसह बालविवाह रोखण्यासाठी जागर प्रकल्प साजरा करण्यात आला.

या वेळी अवनी संस्थेच्या महिला, मुली आणि संस्थापक अध्यक्ष उपस्थित होते. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी “बालविवाह संपुष्टात आला पाहिजे”, “आधी शिक्षणाचा अधिकार, मग लग्नाचा विचार” अशा घोषणा देत दसरा चौक घोषणांनी दुमदुमून गेला.

या उपक्रमाद्वारे समाजात बालविवाहाविरोधात जनजागृती निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी अमिताभ बच्चन यांना अवनी संस्थेच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

अवनी संस्थेचा हा अभिनव उपक्रम समाजात परिवर्तनाची नवी दिशा दाखवणारा ठरला आहे.

अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त अवनी संस्थेचा उपक्रम – बालविवाह निर्मूलनाचा संदेश!
Total Views: 103