ताज्या बातम्या
राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर टाळा – निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव
By nisha patil - 1/23/2026 3:44:04 PM
Share This News:
राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर टाळा – निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक व संस्थांना प्रशासनाचे आवाहन
कोल्हापूर : राष्ट्रध्वजाचा सन्मान अबाधित राहावा व त्याचा अवमान होऊ नये यासाठी जिल्ह्यात कुठेही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे.
२६ जानेवारी रोजी जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन समारंभ साजरा होणार असून नागरिक, शासकीय-निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक व सामाजिक संस्थांनी कागदी राष्ट्रध्वजाचा योग्य पद्धतीने वापर करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. वापरानंतर राष्ट्रध्वज रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी फेकू नये, तसेच खराब झाल्यास ध्वजसंहितेनुसार सन्मानपूर्वक नष्ट करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा अवमान केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा १९७१ अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर टाळा – निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव
|