बातम्या
“राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण”च्या ७५ वर्षांनिमित्त शिवाजी विद्यापीठात जनजागृती कार्यशाळा
By nisha patil - 8/13/2025 3:13:36 PM
Share This News:
“राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण”च्या ७५ वर्षांनिमित्त शिवाजी विद्यापीठात जनजागृती कार्यशाळा
कोल्हापूर | १२ ऑगस्ट २०२५ — राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) उप-क्षेत्रीय कार्यालय, कोल्हापूर व शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागाच्या संयुक्त विद्यमाने “राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण (NSS) ची ७५ वर्षे” या विषयावर एकदिवसीय जनजागृती कार्यशाळा आज निलांबरी सभागृहात पार पडली.
कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. एस. बी. महाडिक, डॉ. रुही कुलकर्णी, श्री. वेदान्त कोंडकर व प्रा. एस. व्ही. राजगुरू आदी मान्यवर उपस्थित होते.
कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना एनएसओच्या डेटाचे सखोल विश्लेषण करून राष्ट्रविकासात योगदान देण्याचे आवाहन केले. पुढील सत्रांमध्ये डॉ. रुही कुलकर्णी यांनी एनएसएसच्या ७५ वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेतला. अजय कुमार यांनी आवधिक श्रम बल सर्वेक्षणावर तर वरुण कुमार यांनी असंघटित क्षेत्रातील उद्यमांच्या वार्षिक सर्वेक्षणावर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत सांख्यिकी क्षेत्रातील करिअर व इंटर्नशिपच्या संधींची माहितीही देण्यात आली. विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांतील २०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. सूत्रसंचालन सिद्धार्थ सिंग यांनी केले, तर आभार अभिषेक आगरे यांनी मानले.
“राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण”च्या ७५ वर्षांनिमित्त शिवाजी विद्यापीठात जनजागृती कार्यशाळा
|