शैक्षणिक

शिवाजी विद्यापीठात बी.एस्सी. मायक्रोबायोलॉजी (AEDP) अभ्यासक्रमास प्रारंभ – उद्योगसज्ज पदवीसाठी सुवर्णसंधी

B Sc Microbiology AEDP course starts


By nisha patil - 4/8/2025 4:27:14 PM
Share This News:



शिवाजी विद्यापीठात बी.एस्सी. मायक्रोबायोलॉजी (AEDP) अभ्यासक्रमास प्रारंभ – उद्योगसज्ज पदवीसाठी सुवर्णसंधी
 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिक्षण, संशोधन आणि उद्योग यांचा त्रिसूत्री समन्वय साधणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागामार्फत बी.एस्सी. मायक्रोबायोलॉजी (AEDP) या अभिनव अभ्यासक्रमाची सुरुवात शैक्षणिक वर्ष २०२५–२६ पासून करण्यात आली आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020)विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC-AEDP) मार्गदर्शक तत्त्वांनुसार विकसित केलेला हा महाराष्ट्रातील पहिलाच “Apprenticeship Embedded Degree Programme” (AEDP) ठरणार आहे. या अभ्यासक्रमात अंतिम सहावे सत्र प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षणासाठी राखीव असून, विद्यार्थ्यांना stipend सह उद्योग प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे.


उद्योगसज्ज पदवीसाठी नवा मार्ग

या अभ्यासक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना Industry-Ready बनवणे हे असून, पुढील क्षेत्रांमध्ये करिअर संधी खुल्या आहेत:

  • औषध निर्मिती उद्योग

  • अन्न व दुग्ध प्रक्रिया

  • कृषी जैवतंत्रज्ञान व जैविक खते

  • पर्यावरणीय विश्लेषण

  • वैद्यकीय प्रयोगशाळा

  • जैवउद्योजकता (Bioentrepreneurship)


अभ्यासक्रमाचे ठळक तपशील

🔹 अभ्यासक्रमाचे नाव: बी.एस्सी. मायक्रोबायोलॉजी – AEDP
🔹 कालावधी: ३ वर्षे (६ सत्रे)
🔹 औद्योगिक प्रशिक्षण: सहावे सत्र (Full Semester with Stipend)
🔹 प्रवेश क्षमता: ६० विद्यार्थी (पहिला अर्ज, पहिली संधी तत्त्वावर)
🔹 पात्रता: १२वी विज्ञान शाखा
🔹 प्रारंभ तारीख: ११ ऑगस्ट २०२५


सूक्ष्मजीवशास्त्र विभागाची यशस्वी वाटचाल

सन २००५ मध्ये स्थापन झालेल्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने शिक्षण, संशोधन व कौशल्याधारित उपक्रमांतून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

विभागात अद्ययावत प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापक आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध प्रकाशित करणारे संशोधक कार्यरत आहेत. विभागाचे विद्यार्थी NET, GATE, MPSC, UPSC परीक्षांत यशस्वी ठरले असून अनेकजण आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्था, औद्योगिक कंपन्या व शासकीय सेवांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत.


संपर्कासाठी:

📞 प्रा. डॉ. पंकज पवार (विभागप्रमुख) – 9921891068
📞 प्रा. डॉ. नईम नदाफ – 8208965659
📞 प्रा. हर्षद कांबळे – 8806626107

बी.एस्सी. मायक्रोबायोलॉजी (AEDP) हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत प्रत्यक्ष उद्योग जगतातील अनुभव देणारा ठरणार आहे. इच्छुकांनी लवकर अर्ज करावा, असे आवाहन सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


शिवाजी विद्यापीठात बी.एस्सी. मायक्रोबायोलॉजी (AEDP) अभ्यासक्रमास प्रारंभ – उद्योगसज्ज पदवीसाठी सुवर्णसंधी
Total Views: 92