खेळ

BCCI चा 2024-25 करार जाहीर : रोहित, विराट, बुमराह A+ ग्रेडमध्ये कायम

BCCIs 202425 contract announced


By nisha patil - 4/21/2025 3:39:20 PM
Share This News:



 BCCI चा 2024-25 करार जाहीर : रोहित, विराट, बुमराह A+ ग्रेडमध्ये कायम

BCCI चा कडक संदेश : रणजी वगळणाऱ्या खेळाडूंना अटींसह संधी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2024-25 हंगामासाठी वरिष्ठ पुरुष खेळाडूंसाठी वार्षिक करार जाहीर केले आहेत. हे करार 1 ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीसाठी असतील.रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना ग्रेड A+ मध्ये स्थान देण्यात आले आहे. 

ए ग्रेडमध्ये मोहम्मद सिराज, के.एल. राहुल, शुभमन गिल, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी आणि ऋषभ पंत यांचा समावेश आहे. बी ग्रेडमध्ये सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यर यांची निवड झाली आहे.
 

विशेष बाब म्हणजे, मागील वर्षी वगळण्यात आलेले श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांना यंदा अनुक्रमे बी आणि सी ग्रेडमध्ये स्थान देण्यात आले आहे.


BCCI चा 2024-25 करार जाहीर : रोहित, विराट, बुमराह A+ ग्रेडमध्ये कायम
Total Views: 124