राजकीय
भाजपा कोल्हापूर महानगराची कार्यकारिणी घोषित
By nisha patil - 8/13/2025 4:03:37 PM
Share This News:
भाजपा कोल्हापूर महानगराची कार्यकारिणी घोषित
कोल्हापूर दिनांक 13 काल दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई भाजपा प्रदेश कार्यालय याठिकाणी भाजपा कोल्हापूर महानगरच्या जिल्हा कार्यकारिणीवर मा. प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण व नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थित शिक्कामोर्तब करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्र.का.सदस्य राहुल चिकोडे यांची उपस्थिती होती.
आज दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी भाजपा कोल्हापूर महानगरची जिल्हा कार्यकारिणी नामदार चंद्रकांतदादा पाटील व खासदार धनंजय महाडिक,आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी घोषित केली.
नूतन पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा....
भाजपा कोल्हापूर महानगराची कार्यकारिणी घोषित
|