ताज्या बातम्या

भाजपचे आमदार शिवाजारीव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशा-यावरून ३५०० रूपये ऊसाचा दर देणा-या कारखान्यांना ३४०० रूपये दर देण्यास भाग पाडत आहेत.

BJP MLA Shivajariv Patil


By nisha patil - 11/24/2025 11:11:26 AM
Share This News:



सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ३५०० रूपये दर जाहीर केले आहेत. मात्र आजरा चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील साखर कारखाने भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या सांगण्यावरून ३४०० रूपये दर जाहीर केले आहेत. 
    त्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ओलम शुगर राजगोळी खुर्द येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. 
      आज सायंकाळी राजू शेट्टी यांनी आंदोसनस्थळी भेट देवून शेतक-यांना मार्गदर्शन केले. 

      तालुक्यातील शेतक-यांना ३४०० रूपये दर मान्य नसून आज सकाळपासून कारखान्यांचा गळीत हंगाम बंद पाडला आहे. 
     एकीकडे जिल्ह्यातील सराव कारखानदार ३५०० रूपये दर जाहीर केले असताना आमदार शिवाजीराव पाटील यांनी साखर कारखानदारांना संघटित करून शेतक-यांच्या विरोधात भुमिका घेतल्याने शेतकरी संतप्त झालेले आहेत. 
      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊस उत्पादक शेतक-यांना तीन टप्यात एफ. आर. पी. देण्यासाठी शेतक-यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून आमदार शिवाजाराव पाटील यांनी ही भुमिका घेतली असल्याची शंका शेतकरी ऊपस्थित करू लागले आहेत. 
    भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या सांगण्यावरून प्रचंड पोलिस बंदोबस्त कारखान्यास देण्यात आलेला आहे. 
       चंदगड आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील शेतकरी संतप्त होवून कारखाना कार्यस्थळावर रात्रीचे जेवण करण्यास सुरवात करून ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले असून जोपर्यंत जिल्ह्यातील कारखान्यांप्रमाणे दर मिळणार नाही तोपर्यंत कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय ऊस उत्पादक शेतक-यांनी घेतला आहे.


भाजपचे आमदार शिवाजारीव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशा-यावरून ३५०० रूपये ऊसाचा दर देणा-या कारखान्यांना ३४०० रूपये दर देण्यास भाग पाडत आहेत.
Total Views: 44