बातम्या
सोनिया-राहुल गांधींविरोधात भाजप युवा मोर्चाचं कोल्हापुरात आंदोलन
By nisha patil - 4/18/2025 4:35:16 PM
Share This News:
सोनिया-राहुल गांधींविरोधात भाजप युवा मोर्चाचं कोल्हापुरात आंदोलन
"भ्रष्टाचार्यांना अटक करा"ची मागणी करत काँग्रेस कार्यालयाकडे कूच; पोलिसांनी आंदोलकांना अडवलं
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप युवा मोर्चाच्या वतीने आज कोल्हापुरात तीव्र आंदोलन करण्यात आलं. डॉ. अरविंद माने, गिरीश साळुंखे आणि धीरज करळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं.
काँग्रेस पक्षातील नेत्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. “भ्रष्टाचारी काँग्रेस नेत्यांना अटक करा” अशा घोषणा देत युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटी कार्यालयाकडे कूच केलं.
मात्र, पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना कार्यालयाच्या अगोदरच अडवलं आणि मोठा अनुचित प्रकार होण्यापासून रोखलं. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमकही झाली.
आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र पोलीस बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली.
सोनिया-राहुल गांधींविरोधात भाजप युवा मोर्चाचं कोल्हापुरात आंदोलन
|