राजकीय
भाजपाच्या उमेदवार मुलाखतींचे वेळापत्रक जाहीर
By nisha patil - 2/1/2026 3:14:55 PM
Share This News:
कोल्हापूर :- चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरूआगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीच्या अनुशंगाने भारतीय जनता पार्टी कोल्हापूर( पश्चिम) च्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार असल्याची माहिती भाजपाचे कार्यालय प्रभारी शिवाजी बुवा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली .
या पत्रकात पुढे असे म्हटले आहे .
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका कधीही जाहीर होऊ शकतात. भाजपाने इच्छुक उमेदवारांचे अर्ज जिल्हा कार्यालयाकडे मागीतले होते . त्यानुसार कोल्हापूर पश्चिम जिल्ह्यातुन तब्बल ६५० उमेदवारांनी आपणास उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे . महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नाम. चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार खासदार धनंजय महाडीक , आमदार अमल महाडीक, आमदार शिवाजीराव पाटील, माजी मंत्री भरमु आण्णा पाटील, माजी आमदार संजय बाबा घाटगे, प्रदेश सचिव महेशराव जाधव, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील या नेत्यांचे पॅनेल इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतील .मुलाखतीस येताना इच्छूक उमेदवाराने कोणत्याही प्रकारे शक्ती प्रदर्शन न करता स्वतःच मुलाखतीस यावे असे आवाहन करण्यात आले आहे .
सोमवार दि.५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजले पासून आजरा, गडहिंग्लज, चंदगड .
मंगळवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून भुदरगड , राधानगरी , कागल, भुदरगड .
बुधवार दि. ७ जानेवारी २०२५ सकाळी ११ वाजल्यापासून कोल्हापूर दक्षीण, करवीर ,पन्हाळा, गगनबावडा .
या प्रसिद्धी प्रत्रकावर जिल्हा सरचिटणीस मेजर भिकाजी जाधव, डॉ. आनंद गुरव, महेश चौगले, सौ. सुशिला पाटील यांच्या सह्या आहेत
भाजपाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
|