राजकीय
हुपरीत भाजपा उमेदवारांचा दमदार घर-घर प्रचार...
By nisha patil - 11/22/2025 12:12:06 PM
Share This News:
हुपरी नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचाराला मोठी गति मिळाली आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठीच्या दावेदार मंगलराव माळगे, तसेच प्रभाग क्र. 10 मधील उमेदवार संतोष उर्फ गुंडूभाऊ वाळवेकर आणि सौ. रुपाली अजित उगळे यांनी आज घर-घर भेट देत नागरिकांशी संवाद साधला.
जाहिरनाम्यांचे वाटप करत त्यांनी विकासाभिमुख नेतृत्वाला साथ देण्याचे आवाहन केले. भाजपा व मित्र पक्षाचे उमेदवार हुपरीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचा संदेश त्यांनी प्रत्येक घरापर्यंत पोहोचवला.
नागरिकांकडून या प्रचार मोहिमेला मोठा आणि उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला. मतदारांनी उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून देण्याची तयारी असल्याचे स्पष्ट संकेत दिले. आगामी निवडणुकीत भाजपा व मित्र पक्षांना निर्णायक आघाडी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हुपरीत भाजपा उमेदवारांचा दमदार घर-घर प्रचार...
|