बातम्या
सर्किट बेंचच्या ऐतिहासिक निर्णयानंतर भाजपाचा जल्लोष
By nisha patil - 2/8/2025 3:19:06 PM
Share This News:
सर्किट बेंचच्या ऐतिहासिक निर्णयानंतर भाजपाचा जल्लोष
छत्रपती चौकात ढोलताशा, पेढे वाटप करत आनंदोत्सव साजरा
कोल्हापुरात 40 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सर्किट बेंचच्या मंजुरीच्या ऐतिहासिक निर्णयामुळे भारतीय जनता पार्टीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोलताशा, पेढे वाटप आणि घोषणा देत उत्साहात आनंदोत्सव साजरा केला.
या वेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नेत्यांनी महायुती सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री यांचे अभिनंदन केले. या निर्णयामुळे कोल्हापूरच्या विकासाला गती मिळेल, असे वक्तव्य करण्यात आले.
सर्किट बेंचच्या ऐतिहासिक निर्णयानंतर भाजपाचा जल्लोष
|