राजकीय

भाजप जिल्हा सरचिटणीसाचा आत्महत्येचा प्रयत्न...

BJP district general secretary attempts suicide


By nisha patil - 12/12/2025 11:37:18 AM
Share This News:



फुलेवाडी, कोल्हापूर येथे भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजू मोरे यांनी आर्थिक तणावातून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मोरे यांनी गोळा केलेली भिशीची रक्कम वेळेत परत मिळावी यासाठी गुंतवणूकदारांनी मागील काही दिवसांपासून सतत तगादा लावला होता. मात्र दिलेल्या मुदतीत पैसे परत न देऊ शकल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.

मोरे यांनी एका पतसंस्थेत गुंतवणूकदारांकडून वर्षाला तब्बल 24% व्याजदराचे आमिष दाखवून भिशी गोळा केली होती. अनेक सामान्य नागरिकांनी पैसे गुंतवल्याने भिशी परत मिळण्यात झालेल्या उशिरीबद्दल तणाव वाढला होता. 9 नोव्हेंबर रोजी पैसे देण्याचे आश्वासन देऊनही गोंधळ झाल्यावर मोरे यांनी विष प्राशन केले. सध्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


भाजप जिल्हा सरचिटणीसाचा आत्महत्येचा प्रयत्न...
Total Views: 47