राजकीय
विकासकामांच्या जोरावर भाजप निवडणुकीच्या मैदानात"
By nisha patil - 7/21/2025 3:41:48 PM
Share This News:
विकासकामांच्या जोरावर भाजप निवडणुकीच्या मैदानात"
"भुदरगडला ७.८ कोटींचे हायमॅक्स दिवे; बारदेसकरांचा दावा"
भुदरगड तालुक्यात आकुर्डे जिल्हा परिषद मतदार संघात २४ कोटींची विकासकामं पूर्ण झाली असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका भाजप पक्ष कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आणि विकासकामांच्या बळावर मोठ्या जोरात लढवणार असल्याचे प्रतिपादन भाजप नेते देवराज बारदेसकर यांनी केले.
राज्यसभा खासदार धनंजय महाडिक व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आकुर्डे मतदारसंघातील १२ गावांमध्ये आणि भुदरगड तालुक्यातील २० गावांमध्ये सोलर हायमॅक्स (पथदिवे) मंजूर झाले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यासाठी एकूण ७६ कोटींचे पथदिवे मंजूर झाले असून, त्यापैकी भुदरगडसाठी ७.८० कोटी, आजरा – ७.१० कोटी आणि राधानगरी – १०.२० कोटी रुपयांचे सोलर पथदिवे देण्यात येणार आहेत.
ही पत्रकार परिषद श्री मनवेल बारदेसकर एज्युकेशन सोसायटी, गारगोटी येथे पार पडली. यावेळी भुदरगड युवाशक्ती अध्यक्ष नंदू शिंदे, जिल्हा भाजपा क्रीडा सेल अध्यक्ष अमर पाटील, युवा नेते युवराज पाटील, दिगंबर देसाई, शक्तीजित पोवार आदी मान्यवर उपस्थित होते.
तारा न्यूज सठी प्रतिनिधी प्रकाश खतकर भुदरगड
विकासकामांच्या जोरावर भाजप निवडणुकीच्या मैदानात"
|