बातम्या
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पुण्यतिथीनिमित्त भाजपकडून अभिवादन
By nisha patil - 6/23/2025 7:40:32 PM
Share This News:
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पुण्यतिथीनिमित्त भाजपकडून अभिवादन
कोल्हापूर (ता. २३) : भारतीय जनसंघाचे संस्थापक आणि राष्ट्रनिष्ठ विचारवंत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने करवीर नगर वाचन मंदिर येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात आणीबाणी काळातील सत्याग्रही आणि राजबंदींचा सत्कार करण्यात आला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाच्या ११ वर्षांच्या कामगिरीवर आधारित प्रदर्शनीचे उद्घाटनही करण्यात आले.
खासदार महाडिक यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. तर महेश जाधव यांनी ३७० कलम रद्द करून मुखर्जी यांना खरी श्रद्धांजली अर्पण झाल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पुण्यतिथीनिमित्त भाजपकडून अभिवादन
|