राजकीय

हुपरी नगरपंचायतीत भाजपला स्पष्ट बहुमत; मंगलराव माळगे नगराध्यक्ष

BJP has a clear majority in Hupari Nagar Panchayat Mangalrao Malge is the Mayor


By nisha patil - 12/21/2025 12:17:04 PM
Share This News:



हुपरी :-हुपरी नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली आहे. नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार मंगलराव माळगे यांनी विजय मिळवून नगराध्यक्षपद पटकावले आहे.

नगरसेवक पदाच्या निवडणुकीत भाजपने एकूण १८ जागांवर दणदणीत विजय मिळवला असून मनसेला २ जागा मिळाल्या आहेत. या निकालामुळे हुपरी नगरपंचायतीत भाजपचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे.

निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. विजयी उमेदवारांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून अभिनंदन करण्यात आले.

नव्या सत्तेमुळे हुपरी नगरपंचायतीच्या माध्यमातून आगामी काळात विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे


हुपरी नगरपंचायतीत भाजपला स्पष्ट बहुमत; मंगलराव माळगे नगराध्यक्ष
Total Views: 103