बातम्या
कराडमध्ये भाजपा संघटन पर्व अंतर्गत बैठक; राष्ट्र प्रथम हेच भाजपचे धोरण — रविंद्र चव्हाण
By nisha patil - 4/26/2025 10:00:31 PM
Share This News:
कराडमध्ये भाजपा संघटन पर्व अंतर्गत बैठक; राष्ट्र प्रथम हेच भाजपचे धोरण — रविंद्र चव्हाण
कराड येथे भाजप संघटन पर्व व वस्ती संपर्क अभियानांतर्गत झालेल्या बैठकीत भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी "राष्ट्र प्रथम, मग पक्ष आणि नंतर कार्यकर्ता" ही भाजपची विचारधारा असल्याचे सांगितले.
सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील खासदार, आमदार आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. भाजपच्या दीड कोटी सदस्यसंख्येबद्दल सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.
कराडमध्ये भाजपा संघटन पर्व अंतर्गत बैठक; राष्ट्र प्रथम हेच भाजपचे धोरण — रविंद्र चव्हाण
|