बातम्या

भाजपकडून सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त ‘एकता दौड’ — कोल्हापुरात उत्साहात आयोजन

BJP organizes Ekta Daud

By nisha patil - 10/31/2025 4:51:57 PM
Share This News:

भाजपकडून सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त ‘एकता दौड’ — कोल्हापुरात उत्साहात आयोजन

भारतीय जनता पार्टी, कोल्हापूर यांच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘एकता दौड’ दसरा चौक येथून सुरू होऊन शिवतीर्थ (श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक) येथे संपन्न झाली.

या प्रसंगी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, भाजप प्रदेश सचिव महेश जाधव आणि जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी भाजपचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

भाजपकडून सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त ‘एकता दौड’ — कोल्हापुरात उत्साहात आयोजन
Total Views: 55