विशेष बातम्या
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे संघटनात्मक बैठकांचे आयोजन
By nisha patil - 10/17/2025 4:13:38 PM
Share This News:
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे संघटनात्मक बैठकांचे आयोजन
प्रदेश सचिव महेश जाधव आणि जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांचे प्रमुख उपस्थितीत इच्छुक उमेदवारांची बैठक
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने शहरातील नवीन घोषित प्रभागांमध्ये संघटनात्मक बैठका घेतल्या. प्रभाग क्रमांक १५, १४, ४ तसेच ३ व १२ मधील वार्डांच्या बैठकीत भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव व जिल्हाध्यक्ष विजय जाधव प्रमुख उपस्थित होते.या बैठकीत इच्छुक उमेदवारांसोबत प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत आगामी निवडणुकीसाठी तयारी, उमेदवार निवड व संघटनात्मक कामकाजावर चर्चा करण्यात आली.भाजपच्या कार्यालयातून जारी केलेल्या माहितीनुसार, या बैठकींचा उद्देश शहरातील संघटनात्मक बळकटी व निवडणुकीत एकसंध तयारी सुनिश्चित करणे हा होता.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे संघटनात्मक बैठकांचे आयोजन
|