विशेष बातम्या

महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपकडून बाबासाहेबांना अभिवादन

BJP pays tribute to Babasaheb


By nisha patil - 6/12/2025 6:20:45 PM
Share This News:



महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपकडून बाबासाहेबांना अभिवादन

 महेश जाधव व विजय जाधव यांच्या हस्ते स्मारकाला पुष्पहार अर्पण

कोल्हापूर – भारतीय जनता पार्टी कोल्हापूर तर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त छत्रपती राजाराम महाराज विमानतळ आणि ऐतिहासिक बिंदू चौक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले. भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव आणि महानगर अध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते स्मारकाला पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली.

या प्रसंगी भाजप कोल्हापूर शहरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन महेश बाळासाहेब जाधव, यांनी केले.


महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपकडून बाबासाहेबांना अभिवादन
Total Views: 14