बातम्या
महापालिकेसाठी भाजप सज्ज - जिल्हाध्यक्ष विजय जाधव
By nisha patil - 9/5/2025 3:34:40 PM
Share This News:
महापालिकेसाठी भाजप सज्ज - जिल्हाध्यक्ष विजय जाधव
महापालिकेत भाजपाचा झेंडा रोवण्याचा निर्धार
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणूका चार महिन्यांच्या आत घेण्यात याव्यात असे आदेश दिले. त्यामुळे अनेक महीने थांबलेली शासकीय प्रक्रिया पुन्हा जोमाने कार्यरत झाली आहे. याचधर्तीवर भाजपा कोल्हापूरच्या वतीने जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते यांची आगामी महापालिका विषयात आढावा बैठक जिल्हा कार्यालयात संपन्न झाली.
यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव आगामी काळात आपल्या प्रभागात नागरिकांच्यासाठी आवश्यक गोष्टी, उपक्रम, शिबिरे राबण्याचे आवाहन केले. आगामी काळात सह पालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या जनता दरबाराच्या माध्यमातून आपल्या प्रभागातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत, आरोग्य कक्ष मुख्यमंत्री सहायता पेक्षा या माध्यमातून आरोग्याची मदत आपल्या प्रभागात करावी असे सांगतपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक देशहिताचे निर्णय घेत आहेत. राज्यात भाजपा सरकार अनेक विकासकामे हात घेऊन ती मार्गी लावत आहे. त्यामुळे राष्ट्र हिताची, विकासाची अनुभूती प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी आगामी महापालिकेत भाजपाला मोठे यश मिळण्यासाठी आपण सर्वांनी एकदिलाने कार्यरत राहून पक्ष कार्यात सज्ज रहावे असे आवाहन केले. दरम्यान प्रदेश सचिव महेश जाधव यांनी देखील यावे मार्गदर्शन केले.
बैठकीप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, राहुल चिकोडे, विलास वासकर, गायत्री राऊत, डॉ राजवर्धन, रूपाराणी निकम, माधुरी नकाते, गिरीश साळोखे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिकेसाठी भाजप सज्ज - जिल्हाध्यक्ष विजय जाधव
|