विशेष बातम्या
गुडाळमधून भाजपमध्ये शक्तीप्रदर्शन; दूध संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये
By nisha patil - 5/17/2025 12:18:11 AM
Share This News:
गुडाळमधून भाजपमध्ये शक्तीप्रदर्शन; दूध संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये
राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथील स्व. इंदिरा पाटील सहकारी दूध संस्थेचे अध्यक्ष प्रा. एस. बी. पाटील व कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. कोल्हापुरातील भाजप कार्यालयात खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात सागर वागरे, युवराज पाटील, दुलाजी पाटील, आर. बी. पाटील आदींसह अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
खासदार महाडिक यांनी सर्वांचे स्वागत करत गाव आणि संस्थांच्या विकासासाठी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, उपाध्यक्ष संभाजीराव आरडे, रवीश पाटील यांचीही उपस्थिती होती.
गुडाळमधून भाजपमध्ये शक्तीप्रदर्शन; दूध संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये
|