राजकीय

मुडशिंगीत भाजपला बळकटी : वंदना–विजय पाटील यांचा जाहीर प्रवेश

BJP strengthened in Mudshingi


By nisha patil - 4/2/2026 3:25:28 PM
Share This News:



मुडशिंगीत भाजपला बळकटी : वंदना–विजय पाटील यांचा जाहीर प्रवेश
 

मुडशिंगीचे माजी जिल्हा परिषद सदस्य वंदना विजय पाटील आणि माजी पंचायत समिती सभापती विजय पाटील यांनी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करत स्थानिक राजकारणाला नवे वळण दिले. काँग्रेसकडून निवडून आलेल्या पाटील दाम्पत्याने आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केल्याने गडमुडशिंगी व गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे.
 

आमदार अमल महाडिक यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, दोन्ही जिल्हा परिषद मतदारसंघात भाजप उमेदवारांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याची ग्वाही पाटील दाम्पत्याने दिली. या प्रवेशामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे संघटन अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.


मुडशिंगीत भाजपला बळकटी : वंदना–विजय पाटील यांचा जाहीर प्रवेश
Total Views: 5