राजकीय

🔹 चंदगड नगरपालिकेत भाजपचा सत्ता विजय

BJP wins power in Chandgad Municipality


By nisha patil - 12/21/2025 11:45:24 AM
Share This News:



चंदगड:-  चंदगड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुनील काणेकर यांनी निर्णायक विजय मिळवला आहे. नगराध्यक्षपदासह भाजपने एकूण ९ जागांवर विजय मिळवत नगरपालिकेतील सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस प्रणित राजर्षी शाहू आघाडीला ८ जागा मिळाल्या असून, एक जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय संपादन केला आहे. त्यामुळे चंदगड नगरपालिकेत स्पष्ट बहुमत भाजपकडे गेले आहे.

निकाल जाहीर होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. विजयानंतर शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

चंदगड नगरपालिकेत नव्या सत्तासमीकरणामुळे विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात असून, पायाभूत सुविधा, नागरी सेवा व शहर विकासाच्या दृष्टीने नव्या नेतृत्वाकडून सकारात्मक निर्णय घेतले जातील, अशी आशा व्यक्त होत आहे.

 


🔹 चंदगड नगरपालिकेत भाजपचा सत्ता विजय
Total Views: 49