राजकीय
कोल्हापूर महापौरपदासाठी भाजपाच्या रूपाराणी निकम यांची घोषणा
By nisha patil - 2/2/2026 5:31:15 PM
Share This News:
कोल्हापूर महापौरपदासाठी भाजपाच्या रूपाराणी निकम यांची घोषणा
कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपाच्या रूपाराणी संग्रामसिंह निकम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी ही माहिती दिली. आज रूपाराणी निकम उमेदवारी अर्ज दाखल करणार असून 6 फेब्रुवारी रोजी महापौरपदाची निवड होणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत पहिल्यांदाच भाजपाचा महापौर होणार असल्याने राजकीय वर्तुळाचं लक्ष या निवडीकडे लागलं आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या 81 सदस्यांपैकी भाजपाचे 26, शिवसेनेचे 15, राष्ट्रवादीचे 4 आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचा 1 असा महायुतीकडे एकूण 46 नगरसेवकांचा पाठिंबा आहे. तर काँग्रेसकडे 35 नगरसेवक असून महाविकास आघाडीकडून महापौरपदासाठी सचिन शेंडे यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापूर महापौरपदासाठी भाजपाच्या रूपाराणी निकम यांची घोषणा
|