विशेष बातम्या
करवीर तालुक्यात भाजपची संघटनात्मक आढावा बैठक;
By nisha patil - 6/14/2025 3:56:32 PM
Share This News:
करवीर तालुक्यात भाजपची संघटनात्मक आढावा बैठक;
प्रदेश सचिव महेश जाधव यांची उपस्थिती
करवीर तालुक्यातील परिते, मुडशिंगी, उचगाव, निगवे खालसा, उजळाईवाडी, पाचगाव या जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम ग्रामीण जिल्ह्याची संघटनात्मक आढावा बैठक नुकतीच पार पडली. भाजपचे प्रदेश सचिव महेश बाळासाहेब जाधव आणि कोल्हापूर पश्चिम ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.
या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघातील पदाधिकारी, मंडल कार्यकर्ते आणि स्थानिक प्रतिनिधी यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी, संघटनात्मक भक्कमपणा, आगामी निवडणूक रणनीती यावर विचारमंथन करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा, महेश यादव, सचिन पाटील, प्रमोद पाटील, तालुका व मंडल पदाधिकारी आणि विविध कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
BJP's meeting करवीर तालुक्यात भाजपची संघटनात्मक आढावा बैठक
|