बातम्या

भाजपची स्थानिक निवडणुकीसाठी तयारी गतीमान; कागल, मुरगुड, आजरा, चंदगड व गडहिंग्लज नगरपरिषदांच्या बैठका पार

BJPs preparations for local elections in full swing

By nisha patil - 11/11/2025 3:49:16 PM
Share This News:

भाजपची स्थानिक निवडणुकीसाठी तयारी गतीमान; कागल, मुरगुड, आजरा, चंदगड व गडहिंग्लज नगरपरिषदांच्या बैठका पार

कोल्हापूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा कार्यालयात निवडणूक तयारीसाठी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत कागल, मुरगुड, आजरा, चंदगड आणि गडहिंग्लज नगरपरिषद तसेच नगरपंचायतींसंदर्भात संघटनात्मक चर्चा व आढावा घेण्यात आला.

या बैठकीस कोल्हापूर जिल्हा निवडणूक प्रभारी खासदार धनंजय महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव आणि कोल्हापूर ग्रामीण पश्चिम निवडणूक प्रमुख महेश जाधव उपस्थित होते.

बैठकीदरम्यान स्थानिक पातळीवरील तयारी, संघटनात्मक बांधणी आणि उमेदवार निवडीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी माजी आमदार संजय (बाबा) घाडगे, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, डॉ. आनंद गुरव, शिवाजी बुवा आणि अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपची स्थानिक निवडणुकीसाठी तयारी गतीमान; कागल, मुरगुड, आजरा, चंदगड व गडहिंग्लज नगरपरिषदांच्या बैठका पार
Total Views: 33