बातम्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी विधायक उपक्रम
By nisha patil - 4/14/2026 10:47:27 PM
Share This News:
**डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी विधायक उपक्रम*
**सामाजिक कार्यकर्ते सुभाष कांबळे यांचे दरवर्षीप्रमाणे विधायक व आदर्शवत उपक्रम*
आजरा(हसन तकीलदार)*:-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती अगदी उत्साहात साजरी होत आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सामाजिक कार्यकर्ते सुभाष कांबळे आणि त्यांच्या मित्रपरिवाराकडून आदर्शवत व विधायक कार्य करण्यात आले.
प्रत्येक सरकारी, निमसरकारी आणि खाजगी कर्मचारी सुट्टीचा आस्वाद घेतात परंतु पोलीस प्रशासन हे एकमेव खाते असे आहे की त्यांना सुट्टी नसते. त्यांच्या हातातील दांडकं समाजाच्या रक्षणासाठी आहे.
सर्वजण सुट्टीचा आनंद घेत असताना पोलीस मात्र कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आपल्या कर्तव्याचे पालन करीत आहेत. जवळपास 42 ते 45 अंश सेल्शिअस तापमानात, उन्हाच्या तडाक्यात अगदी प्रामाणिकपणे पोलीस बांधव आपले कर्तव्य पार पाडत आहेत.
हेच हेरून आजऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते सुभाष कांबळे आणि त्यांच्या मित्र परिवारामार्फत आजरा बसस्थानकावरील प्रवासी आणि प्रामाणिक सेवा बजावीत असलेल्या पोलीसबांधवाना तिव्र उन्हापासून थोडे समाधान मिळावे या हेतूने थंड पाण्याचे बॉटल आणि जिलेबी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यांच्या या आदर्शवत कार्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
यावेळी स्वप्नील कांबळे, सचिन कांबळे, जितू कांबळे, वझरे येथील शिवराज लोखंडे, अभिजित शिंदे, विशाल कांबळे, श्रीधर कांबळे, अक्षय माळी, अभिजित कांबळे, बुरुडे येथील हृषीकेश कांबळे, कुणाल कांबळे, स्वप्नील कांबळे, साहिल कांबळे यांच्यासह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी विधायक उपक्रम
|