ताज्या बातम्या

सरकारच्या लेखी आश्वासनानंतर बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित

Bachchu Kadus hunger strike suspended


By nisha patil - 6/14/2025 4:16:43 PM
Share This News:



सरकारच्या लेखी आश्वासनानंतर बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित

कोल्हापूर/मुंबई – राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. उदय सामंत हे आज उपोषणस्थळी खास दाखल होत शेतकरी नेता बच्चू कडू यांच्याशी चर्चा करण्यासाठी उपस्थित राहिले. त्यांच्या उपस्थितीनंतर व सरकारमार्फत लेखी आश्वासन मिळाल्यानंतर बच्चू भाऊंनी सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल घेत शासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून लेखी आश्वासनाद्वारे निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

त्याचप्रमाणे उद्या (दि. 15 जून) होणारा चक्का जाम आंदोलन देखील सध्या स्थगित करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांनी व नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


Bachchu Kadus :सरकारच्या लेखी आश्वासनानंतर बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित
Total Views: 556