बातम्या

बहिरेवाडी ता. आजरा जवळ भिषण अपघात

Bahirevadi


By nisha patil - 4/6/2026 11:12:03 PM
Share This News:



*बहिरेवाडी ता. आजरा जवळ भिषण अपघात*

*पती पत्नी व मुलांसह चौघांचा दुर्दैवी अंत*

**आजरा(हसन तकीलदार)*:- बहिरेवाडी जवळ दोन कि.मी. अंतरावर असणाऱ्या वळणावर एका आयशरने ( M H •12 •YQ• 1465 ) दुचाकी (MH•09 •EY •9783 ) होंडा शाईनला धडक दिल्याने मोटरसायकल वरील दांपत्यासह व दोन मुलांचा दुर्दैवी अंत झाला. हा अपघात संध्याकाळी सुमारे पाचच्या दरम्यान घडला. मृतामध्ये दिपक दत्तात्राय चांदे (वय ३५),पत्नी शोभा दिपक चांदे (वय ३०), मुलगा जयदिपक चांदे (वय ९) व मुलगी पूर्वा दिपक चांदे (वय ७ वर्षे) यांचा समावेश आहे.हे कुटुंब मुंबईला स्थायिक होते.

ते सुट्टीला आले होते.होन्याळी (ता.आजरा) येथील नातेवाईक यांना भेटून माद्याळ (दुंडगे) येथे परतत असताना चांदे कुटूंबावर काळाने घाला घातला.

     सायंकाळी या भागात पाऊस सुरु होता.पाऊस आल्याने झाडाखाली गाडी थांबवण्यासाठी बाजूला घेत असताना समोरून आयशर ट्रक भरधाव वेगाने आला . पाऊस आणि वेग यामुळे गाडी आवरता आली नाही आणि आयशर ट्रक समोरील मोटरसायकलवर गेली.आयशर खाली सर्व चांदे कुटुंब सापडले.अपघातानंतर आयशर चालक पळून गेला . 

जेसीबीच्या सहाय्याने आयशर बाजूला करून प्रेते बाजूला काढली . आयशर ओम साईराम ट्रान्सपोर्टचा असून आजऱ्याच्या दिशेने चालला होता. घटनास्थळीचे दृष्य भयावह होते. घटनास्थळी डीवायएसपी रामदास इंगवले, सपोनी सागर पाटील, पीएसआय संजय पाटील यांनी भेट दिली.. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण आजरा तालुक्यावर आणि होन्याळी गावावर शोककळा पसरली असून अत्यंत तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


बहिरेवाडी ता. आजरा जवळ भिषण अपघात
Total Views: 623