बातम्या

शहरातील प्राथमिक समस्या निवारणासाठी बहुजन मुक्ति पार्टी कटिबद्ध

Bahujan Mukti Party is committed to solving the primary problems of the city


By nisha patil - 11/23/2025 3:52:19 PM
Share This News:



शहरातील प्राथमिक समस्या निवारणासाठी बहुजन मुक्ति पार्टी कटिबद्ध

शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत अडचणींना प्राधान्य देत बहुजन मुक्ति पार्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सक्रिय भूमिका बजावण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. रस्ते, गटारी, स्वच्छ पाणीपुरवठा, भटक्या कुत्र्यांचा वाढता प्रश्‍न यांसारख्या दैनंदिन सुविधा सुधारण्यावर पक्ष विशेष लक्ष केंद्रीत करणार आहे.

नगरपंचायतीच्या हद्दवाढीसह नव्या वसाहतींना अधिकृतपणे सामावून घेण्याची मागणीही पक्षाने केली आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही सध्याची महत्त्वाची गरज असल्याचे पक्षनेत्यांनी सांगितले.

सर्वसामान्य जनतेच्या अडचणी कमी करण्यासाठी विविध सवलतींची अंमलबजावणी करण्यासही पक्ष कटिबद्ध असून, “शहरातील प्राथमिक समस्या सोडवणे हीच आमची पहिली प्राधान्यक्रमाची जबाबदारी असेल” असे पक्षाने स्पष्ट केलं आहे.


शहरातील प्राथमिक समस्या निवारणासाठी बहुजन मुक्ति पार्टी कटिबद्ध
Total Views: 250