कृषी

बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक लाख सह्यांची मोहीम सुरु

Bahujan Mukti Party launches one lakh signature


By nisha patil - 10/9/2025 12:42:37 PM
Share This News:



बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक लाख सह्यांची मोहीम सुरु
आजरा (हसन तकीलदार):-वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांना निर्माण झालेल्या समस्येच्या निराकरणासाठी गेल्या  सहा ते सात महिन्यापासून आजरा, गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड या तालुक्यांमध्ये निरंतर बहुजन मुक्ती पार्टीचे आंदोलन सुरू आहे..

यामध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने निवेदन देणे, धरणे प्रदर्शन करणे, आजरा बंद करणे यासारखी टप्प्याटप्प्याने आंदोलने केलेली आहेत. यामुळे आजऱ्यातील जे शेतकरी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जखमी झाले होते अथवा मृत्यू पावले होते त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना सरकारने  नुकसान भरपाई दिली. याशिवाय सोलर फेन्सिंग म्हणजेच सौर कुंपणला जी सबसिडी 25% होती ती वाढवून 75% पर्यंत नेली. परंतु बहुजन मुक्ती पार्टी ही तडजोड करणारी पार्टी नाही, तर जोपर्यंत कायमची उपाययोजनेची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत लढा देणार असल्याचे सांगितले.

बहुजन मुक्ती पार्टीची मुख्य मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हा लढा पूर्ण होणार नाही.‌शेवट पर्यंत लढा देणार.
आता  बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने एक लाख लोकांच्या सह्यांचे निवेदन जिल्हा वनसंरक्षक, जिल्हाधिकारी, वनमंत्री व पालकमंत्री यांना देणार असल्याचे डॉ. उल्हास त्रिरत्ने यांनी सांगितले. त्याची सुरुवात काल पासून मलिग्रे ता. आजरा या गावापासून करण्यात आली.

मलिग्रे गावातील ग्रामस्थांनी बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खूप चांगले स्वागत केले व लगेचच सह्यांच्या अभियानात सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे नेतृत्व डॉ. सुदाम हरेर,  राहुल मोरे,  अमित सुळेकर,मार्गदर्शक  डॉ. उल्हास त्रिरत्ने ,  नितीन राऊत,  शरद पाटील,  सूर्यकांत कांबळे, संदिप दाभिलकर,  शेखर देशमुख यांनी व कार्यकर्त्यांनी केले.
यावेळी  संजय घाटगे, आप्पा नेसरकर,शिवाजी भगुत्रे, विश्वास बुगडे, बाबु सावंत, वामन दरेकर. सर्व ग्रामस्थ उपस्थित होते


बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक लाख सह्यांची मोहीम सुरु
Total Views: 111