शैक्षणिक
बहुजन मुक्ती पार्टी करणार एक दिवशीय धरणे आंदोलन
By nisha patil - 11/9/2025 11:06:21 AM
Share This News:
बहुजन मुक्ती पार्टी करणार एक दिवशीय धरणे आंदोलन
चंदगड (हसन तकीलदार):-चंदगड तालुक्यातील काही गावामध्ये पूर्वीचे महसूल पुरावे उपलब्ध नसल्यामुळे त्यांना जात प्रमाणपत्र मिळत नाही. येथील रहिवाश्यांना गेल्या अनेक दिवसापासून या प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालय, प्रांताधिकारी यांच्याकडे हेलपाटे मारावे लागत आहेत.
चंदगड तहसीलदार जात प्रमाणपत्र मागणाऱ्या पालकांना जाणीवपूर्वक कुरुंदवाड येथे हेलपाटे घालावयास लावून त्यांना त्रास देण्याचा प्रकार होत असलेबाबत वेळोवेळी निदर्शनास आणून दिले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे.
परंतु यावर कोणतीही उपाय योजना न आखल्याने दि. 27सप्टेंबर 2025रोजी प्रांताधिकारी गडहिंग्लज कार्यालय येथे जिल्हास्तरीय एक दिवशीय धरणे आंदोलन करणार असलेबाबत बहुजन मुक्ती पार्टीने प्रांताधिकारी गडहिंग्लज यांना निवेदन दिले आहे.
अनुसूचित जातीतील व्यक्तींना जात प्रमाणपत्र मिळत नसल्याने बहुजन मुक्ती पार्टीने वेळोवेळी निवेदने व आंदोलने केली आहेत. 5ऑगस्ट 2025रोजी चंदगड तहसीलदार यांना निवेदन, 7ऑगस्ट 2025रोजी प्रांताधिकारी यांना निवेदन, 30ऑगस्ट 2025रोजी चंदगड तहसीलदार कार्यालयासमोर केलेले धरणे आंदोलन, 4सप्टेंबर 2025रोजी चंदगड तहसीलदार व प्रांताधिकारी यांचे समवेत चंदगड येथे झालेली चर्चा.
इतके सर्व करूनही जात प्रमाणपत्र देताना अडचणी निर्माण होत आहेत. विद्यापीठात पदवी प्रमाणपत्र तपासण्याची प्रक्रिया असते, विद्यापीठ विद्यर्थ्यांच्या अपरोक्ष त्याचे गुणपत्रक तपासत असते त्याचप्रमाणे शासनाने देखील स्थानिक पातळीवर चौकशी करावी.
कोतवाल, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक हे स्थानिक अधिकारी असतात. त्यांच्याकडूनच रहिवासी दाखला देण्यात येत असतानासुद्धा केवळ एखादा पुरावा उपलब्ध होत नाही म्हणून प्रमाणपत्र देण्यात येत नाही हे दुर्दैवी आहे. यामुळे कित्येक विद्यार्थी उच्च शिक्षणापासून दूर होऊन शिक्षणापासून वंचित रहात आहेत.
हा अन्याय दूर करून हा नियम शिथिल करून जात प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी आता शनिवार दि. 27सप्टेंबर 2025 रोजी प्रांताधिकारी गडहिंग्लज कार्यालयासमोर सकाळी 11:00वाजलेपासून जिल्हास्तरीय एक दिवशीय धरणे आंदोलन करणार असलेबाबत प्रांताधिकारी गडहिंग्लज यांना बहुजन मुक्ती पार्टीने निवेदन दिले आहे.
या निवेदनावर व्हॉल्टेयर नाग (महासचिव चंदगड विधानसभा),विनायक खांडेकर (सचिव चंदगड विधानसभा), डॉ. उल्हास त्रिरत्ने (महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष), राहुल मोरे (राधानगरी विधानसभा प्रभारी), अमित सुळेकर(पूर्णवेळ प्रचारक), किरण कांबळे (कागल विधानसभा अध्यक्ष), डॉ. सुदाम हरेर(राधानगरी विधानसभा अध्यक्ष),नितीन राऊत,जोतिबा सुतार, शरद उंडगे, नारायण कांबळे, गोपाळ चव्हाण, सयाजी यादव, नितीन सुतार, काशिमभाई आदि जणांच्या सह्या आहेत.
बहुजन मुक्ती पार्टी करणार एक दिवशीय धरणे आंदोलन
|