राजकीय

बहुजन मुक्ती पार्टीचे "चुल्हा जलाओ" आंदोलन

Bahujan Mukti Partys Chulha Jalao movement


By nisha patil - 5/20/2026 5:31:50 PM
Share This News:



बहुजन मुक्ती पार्टीचे "चुल्हा जलाओ" आंदोलन


आजरा(हसन तकीलदार) - बहुजन मुक्ती पार्टीतर्फे सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात तीन टप्प्यामध्ये 625 जिल्ह्यात "राष्ट्रव्यापी"आंदोलने केली जात आहेत.यामध्ये महागाई, बेरोजगारी, स्मार्ट मीटर, गॅस वितरण आणि वाढलेले दर, पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर या प्रमुख मुद्द्यावर ही आंदोलने करणार आहेत.
याचा पहिला टप्पा हा घरगुती गॅसचा आहे. गॅसचे दर वाढवूनसुद्धा वेळेत गॅस मिळत नसल्याने तसेच ग्रामीण भागासाठी एका सिलेंडरसाठी 45 दिवसांचा व शहरी भागासाठी 25 दिवसांचा कालावधी ठेवला आहे तो साफ चुकीचा आहे.

 

ग्रामीण भागातसुद्धा महिला काजू फॅक्टरी, प्रक्रिया उद्योग, शेतात तसेच इतर कामासाठी दिवसभर बाहेर असतात मग या महिलांना चुलीसाठी लाकडे आणायची कोठून? त्याचप्रमाणे पंतप्रधानांनी महिलांना धुरापासून मुक्ती देण्यासाठी उज्वला गॅस योजना सुरु केली तसेच बहुतांशी खेडेगावात स्लॅबची घरे असल्यामुळे चूल मांडण्यासाठी घरात जागाही नाही अशा परिस्थितीत गृहिणींनी स्वयंपाक करायचा कसा? 45 दिवसांची अट शिथिल करून गृहणींना वेळेत गॅस पुरवठा करावा यासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आजरा तहसीलऑफिस समोर "चुल्हा जलाओ" हे पहिल्या टप्प्यातील आंदोलन करून आजरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.


यावेळी ऍड. विद्या त्रिरत्ने, डॉ. उल्हास त्रिरत्ने, डॉ. सुदाम हरेर, राहुल मोरे, शकुंतला कांबळे, तेजस्विनी देसाई, शोभा कांबळे, गीता कांबळे, नाहिदा महागोंडे, नाजिया शेख, झुल्पीकार शेख, सलीम महागोंडे आदिजण उपस्थित होते.


बहुजन मुक्ती पार्टीचे "चुल्हा जलाओ" आंदोलन
Total Views: 14