विशेष बातम्या
बहुजन मुक्ती पार्टीची एक लाख सह्यांची मोहीम
By nisha patil - 10/12/2025 3:00:00 PM
Share This News:
बहुजन मुक्ती पार्टीची एक लाख सह्यांची मोहीम
आजरा (हसन तकीलदार )*:-बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने एक लाख रहिवाशांच्या सह्यांचे निवेदन वनमंत्री, पालकमंत्री, जिल्हा उपवनसंरक्षक व जिल्हाधिकारी यांना दिले जाणार आहे.
वन्य प्राण्यांचा हैदोस, शेतकऱ्यांचे होणारे अपरिमित नुकसान, वन्य प्रण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडणारे शेतकरी आणि प्रवासी नागरिक यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच यावर योग्य उपाययोजना राबवण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन लोकांच्या सह्या घेत आहेत. हे काम गेली अनेक महिने निरंतर सुरू आहे.
काल मौजे एमेकोंड, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर येथे दशरथ सोनुले व अमित सुळेकर यांनी लोकांना अभियानाची माहिती सांगून त्यांचे अभियान राबवले.बहुजन मुक्ती पार्टीचा लढा हा टप्प्या टप्प्याने आणि शेवट पर्यंत असतो. अनेक लढे लढून त्यांनी ते यशस्वीही केले आहेत. संविधानिक पद्धतीने लढा देऊन यश संपादन करण्यात त्यांची हातोटी आहे. बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी डॉ. उल्हास त्रिरत्ने आणि तालुका प्रमुख डॉ. सुदाम हरेर यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो.
बहुजन मुक्ती पार्टीची एक लाख सह्यांची मोहीम
|