ताज्या बातम्या

स्मार्ट मीटरविरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे निवेदन

Bahujan Mukti Partys statement against smart meters


By nisha patil - 11/12/2025 12:59:43 PM
Share This News:



 कोल्हापूर-: कोल्हापूर जिल्ह्यात महावितरणकडून संमतीशिवाय बसवले जाणाऱ्या स्मार्ट प्रीपेड मीटरला तीव्र विरोध होत असून, बहुजन मुक्ती पार्टीने ही प्रक्रिया तात्काळ थांबवण्याचे निवेदन आजरा येथे दिले.

पक्षाने आरोप केला की स्मार्ट मीटरमुळे अवाजवी बिल, मीटरचा जबरदस्तीने आकारला जाणारा खर्च आणि नागरिकांकडून संमती घेतली जात नसल्यामुळे असंतोष वाढला आहे.

ज्यांना स्मार्ट मीटर नको आहेत, त्यांच्या ठिकाणी जुने पोस्टपेड मीटर पुन्हा बसवावेत, तसेच वाढलेली बिले दुरुस्त करावीत, अशी मागणी करण्यात आली.

निवेदनाची दखल न घेतल्यास धरणे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.


स्मार्ट मीटरविरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे निवेदन
Total Views: 47