बातम्या
बदल्या मिळवून देण्याचे आमिष; दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
By nisha patil - 7/26/2025 7:15:13 PM
Share This News:
बदल्या मिळवून देण्याचे आमिष; दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
₹३०,००० ऑनलाईन उकळले; शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
कोल्हापूर | 26 जुलै 2025 – शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोलीस बदल्या मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संतोष मारुती पानकर आणि धनश्री उदय जमदाप या दोघांविरोधात गु.र.नं. 575/2025 अंतर्गत IPC कलम 308(2), 3(5) नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मनोज हळबे (वय 31, मूळ रा. चंदगड, सध्या गडहिंग्लज) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलीस विभागात बदल्या लवकर मिळवून देतो, असे सांगून दोघा आरोपींनी त्यांच्याकडून ₹३०,००० ऑनलाईन स्वीकारले. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही बदली न झाल्याने त्यांनी फसवणुकीची तक्रार केली.
तपासात दोघांनी खोटी माहिती देऊन विश्वासघात केल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हा 23 जुलै रोजी सकाळी 6:45 वा. घडला असून, तो 26 जुलै रोजी पहाटे 1:45 वा. नोंदविण्यात आला.
या प्रकरणाचा तपास पो.स.ई. आकाश जाधव करत असून, अधिक आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोंगे यांनी दिली.
बदल्या मिळवून देण्याचे आमिष; दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
|